Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

टोरेंट गॅस कंपनीने उद्योजकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करा-हनुमंत पाटील

टोरेंट गॅस कंपनीने उद्योजकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करा-हनुमंत पाटील

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांचे निर्देश 

marathinews24.com

बारामती – उद्योगजकांच्या मागणीचा विचार करता टोरेंट गॅस कंपनीने औद्योगिक क्षेत्राचा सर्व्हे करून पाईपलाईनद्वारे उद्योजकांना विनाअडथळा गॅस पुरवठा करावा, कोणतीही दिरंगाई न करता माफक दराने गॅसचा पुरवठा सुरू राहील याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिले.

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

अमेरिका, इस्राईल आणि इराण मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी बारामती कार्यालयात उद्योजकांना भेडसावणाऱ्या गॅस व इतर समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार,बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, टोरेंट गॅस कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, अमेरिका, इस्राईल व इराण यांच्यामध्ये सुरु युद्धामुळे उद्योगांसाठी लागणाऱ्या महत्वाच्या घटकांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उद्योगावर विपरीत परिणाम होवून उत्पादनास अडथळा निर्माण होत आहे .यामध्ये मुख्यत्वे गॅस टंचाईमुळे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले, या बाबीचा विचार करता गॅस कंपनीने उद्योजकांना सुरळीत गॅसचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे पाटील म्हणाले.

या बैठकीत उद्योग प्रभावित क्षेत्र, कच्च्या मालाचा तुटवडा, उत्पादन खर्च वाढ, निर्यातीवर होणारे परिणाम, आयात समस्या, इंधन, गॅस पुरवठा, कामगार कपात आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×