Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

श्रीरामनवमीनिमित्त बाजीराव रस्ता, लष्कर भागात वाहतूक बदल

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतूक बदल

वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

marathinews24.com

पुणे – श्रीरामनवमीनिमित्त बाजीराव रस्ता आणि लष्कर भागातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याने गुरुवारी (२६ मार्च) दुपारी चारनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. बाजीराव रस्ता आणि लष्कर भागातील वाहतूक बदल रात्री दहापर्यंत लागू राहणार आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

रामनवमी निमित्त पुण्यात वाहतूक बदल – सविस्तर बातमी

टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणारी वाहतूक टिळक रस्त्यावरुन वळविण्यात येणार आहे. शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी टिळक रस्ता, टिळक चौक (अलका चित्रपटगृह चौक), छत्रपती संभाजी पूल, डेक्कन जिमखानामार्गे शिवाजीनगरकडे जावे. लष्कर भागातील वाय जंक्शन येथून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. लष्कर भागातील मिरवणूक ट्रायलक चौकातून १५ ऑगस्ट चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. महंमद रफी चौकातून मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे वळविण्यात येणार आहे. लष्कर भागातील वाहतूक टप्याटप्याने बंद ठेवण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर टप्याटप्याने रस्ते खुले करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

पेरूगेट रस्ता बंद; नागरिकांच्या तक्रारी

टिळक स्मारक ते पेरूगेट दरम्यान असलेला रस्ता श्रीरामनवमीच्या कार्यक्रमासाठी बुधवारी दुपारपासून बंद करण्यात आला. या भागात ध्वनीवर्धक, तसेच विद्युत रोषणाईसाठी लोखंडी सांगाडा उभा करण्यात आल्याने वाहन चालकांची गैरसोय झाली. रस्ता बंद केल्याने या भागातील रहिवाशांची गैरसोय झाली. याबाबत नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या. स्थानिक पोलिसांनी कार्यक्रमासाठी परवानगी दिली असल्याचे समजले. मात्र, टिळक रस्त्याला जोडणारा पेरूगेट रस्ता बंद केल्याने वाहन चालकांसह रहिवाशांना त्रास झाला. अखेर सायंकाळी संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांना संपूर्ण रस्ता बंद न करता वाहनचालकांसाठी जागा सोडण्याची सूचना केली. गोखलेनगर भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही मंडळांकडून मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या देखाव्यांनी जागा व्यापल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×