पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने तरूणाला दिली धमकी
marathinews24.com
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने तरूणाला मनी लॉड्रींग केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर चौकशीच्या बहाण्याने तब्बल २० लाख २४ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना १० ते १३ मे २०२४ कालावधीत येरवड्यात घडली आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएमपीएल बसमध्ये जेष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण येरवड्यात राहायला असून, खासगी कंपनीत कामाला आहे. १० मे २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्याला फोन करून पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर सायबर चोरट्याने तरूणाला मनी लॉड्रींग केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर चौकशीच्या बहाण्याने तब्बल २० लाख २४ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. दरम्यान, काही दिवसांनी याप्रकरणाचा संशय आल्यामुळे तरूणाने संबंधिताला फोन केला असता, त्याने प्रतिसाद देण्याचे टाळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता.
त्यानुसार आता याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करीत आहेत.