Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पीएमपीएल बसमध्ये जेष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

बसमध्ये शिरताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ७० हजार रूपयांची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना २३ मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील स्वतंत्र चौकातील कल्याण ज्वेलर्स बसस्थानकावर घडली आहे. याप्रकरणी दत्तवाडीत राहणार्‍या ६६ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहियानगरमध्ये दहशत माजविणाऱ्या गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला दत्तवाडीत राहायला असून, २३ मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील स्वतंत्र चौकातील कल्याण ज्वेलर्स बसस्थानकात थांबल्या होत्या. महिला बसमध्ये प्रवेश करीत असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या हातातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. बसप्रवासात बांगडी चोरली गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शिरसाट तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×