Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

काञज घाटात ट्रक २०० फूट दरीत कोसळला, वाहनचालक गंभीर जखमी

काञज घाटातील अपघात; ट्रक २०० फूट खोल दरीत

marathinews24.com

पुणे – काञज जुना बोगद्याच्या अलिकडे दरीत ट्रक कोसळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच काञज अग्निशमन वाहन व मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन रवाना केली होती. संबंधित वाहन चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी वाहनचालक हा लातूरचा असून त्याचे नाव विकास रसाळ ( वय ३२) आहे.

चंदननगरमध्ये इमारतीमधील फ्लॅटला आग – सविस्तर बातमी 

घटनास्थळी धाव घेतली असता, जवानांना ट्रक ( क्रमांक एमएच १२ केपी १०७३ ) खोल दरीमध्ये सूमारे २०० फुट अंतरावर पडल्याचे दिसून आले. वाहनचालक जखमी असल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून जवानांनी रश्शी, सेफ्टी बेल्ट याचा वापर करुन तातडीने जखमी असलेल्या वाहनचालकाशी संवाद साधत त्याला धीर देत बाहेर काढले . त्याला उपचाराकरिता शासकीय रुग्णवाहिका १०८ मधून रुग्णालयात रवाना केले. ट्रकचालक हा पुण्याकडून सातारा ते पुणे दिशेने जात होता. कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रदिप खेडेकर व तांडेल वसंत भिलारे, विजय गोसावी, वाहनचालक बंडू गोगावले, उबेद शेख फायरमन किरण पाटील, अक्षय देवकर, मयुर काटे, प्रशांत कुंभार, केतन भोईर, मंगेश खंडाळे, अक्षय शिंदे, किशोर टकले, अन्वर शेख यांनी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×