Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय प्रवासाचा उलगडा होणार

८ ऑगस्टला पुण्यात प्रकट मुलाखत

marathinews24.com

पुणे – अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, प्रशासकीय कारकिर्दीतील धाडसी निर्णयांचा आणि जनहितासाठी केलेल्या कामांचा उलगडा करणारी विशेष प्रकट मुलाखत शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. “भविष्यवेध – संवाद भविष्याचा” या उपक्रमांतर्गत “अनस्टॉपेबल तुकाराम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबारात २ हजार नागरिकांची तपासणी-डॉ. अंजली पाटील – सविस्तर बातमी

मुलाखतीत तुकाराम मुंढे आपल्या बालपणापासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) केलेल्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधणार आहेत. विविध पदांवर कार्यरत असताना घेतलेले कठोर निर्णय, आलेली आव्हाने, प्रशासनातील अनुभव, पारदर्शक कारभाराची भूमिका तसेच समाजहितासाठी केलेल्या उपक्रमांबाबत ते उपस्थितांशी संवाद साधतील. ही विशेष मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप घेणार असून, त्यांच्या प्रश्नांमधून तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणार आहेत.

पुणे लोकल कनेक्ट आणि माय जनसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून होणारी गर्दी लक्षात घेता, पूर्वनोंदणी करण्यासाठी. https://myjansevak.com/event/unstoppable-tukaram या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन आयोजक अमित रुके आणि विरेश आंधळकर यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×