Breking News
तडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबित

फरार आरोपीसह दोघांना अटक; ३ पिस्टल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट तीनने केली अटक

marathinews24.com

पुणे – गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीसह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली आहे. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून तीन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा मिळून १ लाख ८१ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. शुभम साधू चव्हाण (वय २०, रा. त्रियाग सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) आणि शुभम सतीश डोके (वय १९, रा. मेमाणे सोसायटी, नऱ्हे गाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

विमाननगर येथील हॉटेलमध्ये आग; अनुचित प्रकार नाही – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेचे युनिट तीन ४ ऑगस्टला हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेंडे यांना नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या दोन साथीदाराला ताब्यात घेत अंगझडती घेतली. झडतीत ३ गावठी पिस्टले, ३ मॅगझीन, ४ जिवंत काडतुसे, आयफोन मोबाईल, दुचाकी असा १ लाख ८१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तिन्ही आरोपींना नऱ्हे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, अतुल साठे, अमोल काटकर, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×