Breking News
गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एनडीए रस्ता, संगमवाडीत अपघात

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एनडीए रस्ता, संगमवाडी भागात अपघाताच्या घटना घडल्या. एनडीए रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजू नारायण चव्हाण (वय ३१, रा. शिंदे बिल्डींग, कोंढवे-धावडे, एनडीए रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत चव्हाण यांची पत्नी पूनम (वय २७) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात लग्नासाठी तरुणीने केले तरुणाचे अपहरण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्य मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील निमर्डा गावचे रहिवासी आहेत. राजू चव्हाण हे खासगी ठिकाणी नोकरी करतात. गुरुवारी (२८ मे) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीस्वार राजू चव्हाण हे कामावरुन घरी निघाले होते. त्यावेळी एऩडीए रस्त्यावर उत्तमनगर परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार चव्हाण यांना धडक दिली. अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक मिसाळ तपास करत आहेत.

भरधाव मोटारीच्या धडकेत ऑनलाइन खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या एका दुचाकीस्वार कामगाराचा (डिलिव्हरी बाॅय) मृत्यू झाल्याची घटना संगमवाडी परिसरात घडली. प्रेमनाथ रामकृष्ण वानखेडे (वय ५२, रा. सिद्धी टाॅवर्स, दापोडी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत वानखेडे यांचा मुलगा करण (वय ३०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका मोटार चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ वानखेडे हे ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करत होते. दुचाकीस्वार वानखेडे हे संगमवाडी परिसरातून निघाले होते. त्या वेळी खासगी आराम बस थांब्याजवळ भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसंनी दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×