Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची ७२ लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडींग परताव्याचे आमिष पडले महागात

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोघांची ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडी भागात फ्लॅटमधून २ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ६२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तक्रारदाराला दाखविले होते. त्यानंतर तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी ६२ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची १० लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×