उत्तमनगर पोलिसांकडून आरोपीला अटक
marathinews24.com
पुणे – Uttamnagar Koyta Attack : दारुच्या नशेत एकमेकांकडे पाहण्यावरुन झालेल्या वादातून दोघांनी डिलिव्हरी बॉय तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आदित्य गुलाब कांबळे (वय २३, रा. कोंढवे धावडे) असे जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. सागर प्रदीप कोठारी (वय २२, रा. इस्कॉन मंदिराजवळ, उत्तमनगर) याला अटक केली आहे. कोठारी याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; एकाला मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य कांबळे डिलिव्हरी बॉय असून, रविवारी (दि.४ ) तो मित्रासह उत्तमनगरमधील श्री भवानी माता मंदिर चौकात थांबले होते. त्यावेळी आरोपी सागर कोठारी आणि त्याचा अल्पवयीन मित्र हे दारू पिऊन तेथे आले. एकमेकांकडे पाहण्यावरुन आदित्य आणि आरोपींमध्ये वाद झाला. वादातून आरोपींनी आदित्यला शिवीगाळ करुन मारहाण केली. आरोपी कोठारीने आदित्यच्या डोक्यात कोयत्याने वार केल्यामुळे तो जखमी झाला. Uttamnagar Koyta Attack घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आदित्य वर रुग्णालयात उपचार करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी कोठारी याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी दिली. उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करत आहेत.























