Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पुण्यात केशवनगरात वाहनांची तोडफोड

पुण्यात केशवनगरात वाहनांची तोडफोड

वाहन तोडफोडीचे सत्र कायम

marathinews24.com

पुणे – शहरात वाहन तोडफोडीचे सत्र कायम असून, पोलिसांना अद्यापही यावर तोडगा सापडला नसल्यामुळे नागरिकांकडून आर्श्चय व्यक्त केले जात आहे. सहकारनगरमधील वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने हातात कोयत्याने मुंढव्यातील केशवनगरात वाहनांची तोडफोड केली. जोरजोरात आरडाओरड करीत परिसरामध्ये दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुंड प्रशांत धुमाळला मुंबईतून अटक – सविस्तर बातमी 

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंढवा भागातील केशवनगर परिसरात शुक्रवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास दुचाकीस्वार तीन जणांच्या टोळक्याने कोयत्याने अनेक वाहनांची तोडफोड केली. अचानक काचा फुटण्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्यानंतर टोळके वाहनांची तोडफोड करीत असल्याचे दिसून आले. सर्वसामान्यांच्या वाहन तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली असून, मुंढवा पोलिसांसह रात्रगस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा धाक उरला आहे का नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टोळक्याकडून वाहन तोडफोडीच्या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीत झाले असून, मुंढवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केशवनगरातील निवासी परिसरात टोळक्याने धुडगूस घातला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन मुखवटाधारी तरुण दुचाकीवरून येऊन परिसरात धुडगूस घालताना दिसून आले आहेत. वाहन तोडफोड करताना टोळक्याने ‘गौर्‍या कोण आहे? सूर्या कोण आहे?’ अशा घोषणा देत दहशत निर्माण केली. दरम्यान, मागील आठवड्यात सहकारनगरमध्ये चार मोटारींची तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मुंढव्यात वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

दहशत, खुन्नससाठी तोडफोड

टोळक्याने वाहन तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत दुसर्‍या गटासोबत असलेली खुन्नस आणि राग व्यक्त करीत सर्वसामान्यांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, वाहन तोडफोड करणार्‍या टोळक्याचा शोध घेण्यासाठी मुंढवा पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×