Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मेरा युवा भारततर्फे जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे स्पर्धक पात्र

marathinews24.com

पुणे – युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने मेरा युवा भारत, पुणे यांच्या वतीने ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. एमईएस वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व नवरोजी वाडिया कॉलेज येथील टाटा सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धांना जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रदर्शन सहायक विलास कसबे यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमाचे अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्रचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या झोन-१च्या उपायुक्त आशा राऊत, केंद्रीय ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे पी. फणीकुमार, एमईएस वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्या डॉ. मनिषा डाळे, नवरोजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. भारत बहुले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. राऊत यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाज आणि युवकांचा सकारात्मक सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

या अभियानांतर्गत नृत्य, संगीत, पथनाट्य, घोषवाक्य लेखन, वक्तृत्व, स्लॅम कविता, रील/शॉर्ट फिल्म आणि चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. युवकांनी आपल्या कलाविष्कारातून ‘नशामुक्त भारत – विकसित भारत’ हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.

स्पर्धांमध्ये नृत्य प्रकारात ‘ड्रीम ऑफ ड्रामा’, नेस वाडिया कॉलेज, संगीत प्रकारात ‘सिनास्टिक अँड स्पाइस’, वाडिया कॉलेज, पथनाट्य प्रकारात यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, घोषवाक्य लेखनात विद्या विश्वकर्मा, वक्तृत्व स्पर्धेत चैतन्य गर्जे, स्लॅम कविता स्पर्धेत प्रिया पारसनाथ, रील/शॉर्ट फिल्म स्पर्धेत मानव बडगुजार व समूह आणि चित्रकला स्पर्धेत पूर्वा खारकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे यांनी केले.

सूत्रसंचालन आम्रपाली चव्हाण यांनी केले, तर कार्यक्रम समन्वयक स्वप्नील शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अमित पाटील आणि डॉ. कोमल सावंत यांनी विशेष सहकार्य केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×