वाघोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Wagholi Newborn Baby Case : शहरातील वाघोली परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, सातववस्ती येथील आव्हाळवाडी रस्त्याच्या कडेला अवघ्या ५ ते ६ दिवसांच्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला एका बॅगेत ठेवून कचऱ्यात टाकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या अर्भकाला दोन अज्ञातांनी टाकून पळ काढल्याचा संशय आहे. दरम्यान, या अर्भकाला पोलिसांनी याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ९३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात ९ जणांची न्यायालयाकडून दोषमुक्ती ! – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश पिरप्पा कोळी (वय २८, रा. आव्हाळवाडी) हे ऑटो रिक्षा घेऊन जात असताना, त्यांच्या पुढे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तोंडाला रुमाल बांधलेल्या इसमांनी रस्त्याच्या कडेला एक काळ्या रंगाची बॅग फेकून पळ काढला. संशय आल्याने रिक्षाचालक कोळी यांनी थांबून पाहणी केली. (Wagholi Newborn Baby Case) तेव्हा बॅगेतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बॅग उघडून पाहिले असता त्यात पांढऱ्या स्कार्फमध्ये गुंडाळलेली चिमुकली आढळून आली.
‘रिक्षाचालक आकाश कोळी यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत बाळासह वाघोली पोलिस ठाणे गाठले आणि मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केले. अंधार असल्याने आरोपींचे वर्णन सांगता आले नाही. सहाय्यक निरीक्षक विनायक अहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या बाळाला निगडी येथील आधार संस्थेत दाखल करण्यात आले आहे. या बाळाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिस किंवा आधार संस्थेशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.





















