Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

कंपनीत गुंतवणूकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

दोघांविरूद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने महिलेची १६ लाखांची फसवणूक झाल्याची घटना लोणी काळभोरमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑगस्ट ते डिसेंबर २०२० कालावधीत कुशलवाटिका, लोणी काळभोर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

मद्यपी मोटारचालकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोणी काळभोरमध्ये राहायला असून, ऑगस्ट ते डिसेंबर २०२० कालावधीत आरोपींनी महिलेला कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १६ लाख रूपये उकळले. मात्र, त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे तपास करीत आहेत.

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने गंडा

शेअरमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी महिलेला ४ लाख २० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २२ ते २६ मे २०२५ कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ घडली आहे. याप्रकरणी महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारक, बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×