Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

हुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्या

हुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्या

पती अटकेत; सासूसह दीराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – हुंड्यासाठी छळ केल्याने महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसमधील फुरसुंगी भागात घडली. महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीला अटक करण्यात आली असून, सासूसह दीराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या अमोल तेलंग (वय २५, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन अमोल ज्ञानोबा तेलंग (वय २८, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी सासू, तसेच दीराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी वडनमवार (वय ५५, रा. इस्लामपूर, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील लेखापरीक्षकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या हिचा मे महिन्यात अमोल याच्याशी विवा झाला होता. विवाहानंतर माहेरहून दागिने, तसेच पैसे घेऊन येण्याची मागणी विद्याकडे करण्यात आली. पती, सासू, दीराने तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने तिने ९ ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे नुकतीच फिर्याद दिली. हुंड्यासाठी छळ केल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे वडील संभाजी वडनमवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×