Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांचे निर्देश

marathinews24.com

पुणे –  जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समिती बैठकीत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन – बस चालक, मालक, स्कूल बस संघटना, शाळा, नागरिक आदींनी पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५ – सविस्तर बातमी

समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात 11 जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली. त्या अनुषंगाने यावेळी शाळेत मुलांची ने-आण करणाऱ्या बसेस व इतर वाहनांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांच्या पालनाबाबत निर्देश देण्यात आले.

ही वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील यादृष्टीने खबरदारी संबधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. प्रत्येक बस व इतर वाहनात 31 जुलै 2025 पर्यंत सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिला कर्मचाऱ्याची नेमणूक करावी तसेच मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला कर्मचारी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वाहनचालक, वाहक, क्लीनर यांची पोलीस पडताळणी केल्याची खात्री तसेच बसच्या वाहन चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली झाल्याचे प्रमाणपत्राची शालेय परिवहन समिती किंवा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीने करावी. नेत्र तपासणी प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनचालकांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे निर्देश जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीने दिल्याचे जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×