केशवनगरमध्ये महिलेचा मृतदेह सापडला

दोघांना अटक, अनेक महिलांवर अत्याचाराची शक्यता

मृत्यूचे कारण अस्पष्ट

marathinews24.com

पुणे – शहरातील केशवनगर परिसरातील कचरा डेपो जवळ मंगळवारी मध्यरात्री एका महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अफरीन सलीम पठाण (वय २७, रा. वडगाव शेरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

स्वारगेट परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफरीन या ब्युटीपार्लर चालवत होत्या. त्यांचे पती हे बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्या आपल्या दोन मुलांसह भाड्याच्या खोलीत बहिणी सोबत राहायला होत्या. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास केशवनगर येथील कचरा डेपो जवळ महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे मुंढवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, नैसर्गिक मृत्यू, अपघात की अन्य काही प्रकार आहे याबाबत पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×