स्वारगेट परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

शेतीला पाणी देण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला

तीन अल्पवयीनांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – किरकोळ कारणावरुन तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. या प्रकरणी तीन अल्पवयीनांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची ७२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

प्रसाद मारुती माने (वय ३७, रा. सध्या रा. राही रेसीन्डसी, नऱ्हे रस्ता, धायरी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीनांसह पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माने यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने हे मंगळवारी (५ मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास बाहेरगावाहून स्वारगेट परिसरात आले होते. ते स्वारगेट परिसरातील पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. आरोपींकडे माने यांनी पाहिले. त्यानंतर आमच्याकडे का पाहिले ? अशी विचारणा करुन आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. माने यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. माने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माने यांच्यावर वार करणाऱ्या आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×