Breking News
Pune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणका

World Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहात

World Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहात

प्राण्यांशी सुरक्षित वर्तन आणि चाव्यानंतर तातडीच्या उपाययोजनांची माहिती

marathinews24.com

पुणे – सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, घोडेगाव, ता. आंबेगाव येथे जागतिक रेबीज दिन उत्साहात आणि जनजागृतीपर वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना रेबीज (World Rabies Day) आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्राण्यांशी सुरक्षित वर्तन तसेच कुत्रा किंवा अन्य प्राण्याने चावा घेतल्यानंतर करावयाच्या तातडीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

World Rabies Day कार्यक्रमास पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पी. डी. साळवे, शाळेचे प्राचार्य श्री. गणेश गावडे , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा डफळ व डॉ. रुपेश खामकर, तसेच नोडल अधिकारी श्री. गजानन वनारसे उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रेबीज या गंभीर आजाराविषयी सोप्या, शास्त्रीय आणि व्यवहार्य पद्धतीने माहिती दिली. प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, कुत्रा किंवा अन्य प्राण्याने चावा घेतल्यास जखम साबण आणि वाहत्या पाण्याने तात्काळ स्वच्छ धुणे तसेच विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेणे या प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यामुळे रेबीज प्रतिबंध आणि प्राण्यांशी सुरक्षित वर्तन याबाबत विद्यार्थ्यांची समज अधिक दृढ झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कीर्ती टोपे यांनी केले. World Rabies Day उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य-जागरूकता, प्राणीप्रेम, जबाबदार वर्तन आणि सामाजिक आरोग्याबाबतची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, आरोग्य-जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×