पीएमपीएल बसमध्ये प्रवासादरम्यान तरुणाचा मोबाईल लंपास
Marathinews24.com
पुणे- पीएमपीएल बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी तरुणाकडील मोबाइल चोरून नेल्याच्या घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याबाबत पिंटू इंद्रेशकुमार पटेल (वय २६, रा. आंबेगाव) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंटू कामानिमित्त चाकण परिसरात स्थायिक झाला आहे. तो मूळचा परगावातील असून पुणे स्टेशन परिसरातून तो पीएमपी बसने चाकणकडे निघाला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने त्याच्याकडील मोबाइल हिसकावून पळ काढला. पिंटूने आरडाओरडा करेपर्यंत चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.