Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

गोखलेनगरात भरदिवसा पादचारी महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

जेष्ठ महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ हिसकावली, वारजेतील दिगंबरवाडीतील घटना

गोखलेनगरात महिलेला लुटले, भरदिवसा मंगळसूत्र चोरीची घटना

Marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ११ एप्रिलला भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्‍या ६४ वर्षीय महिलेने चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशाने वकीलासह बँक अधिकार्‍यावर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला जनता वसाहतीतील साईराम चौकात राहायला आहेत.  ११ एप्रिलला भरदिवसा सकाळी अकराच्या त्या पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एका चोरट्याने त्यांच्याजवळ दुचाकी उभी केली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात त्याने महिलेचे ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकी दामटली. जेष्ठ महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटा सुसाट पसार झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

 धायरीतील भरदिवसा लुटीची घटना ताजी

दुचाकीवर  चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार   चोरट्याने तिच्या गळ्यातील १ लाख ५०  हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटना २४ मार्चला भरदिवसा पावणेपाच वाजण्याच्या सुमारास   धायरीतील त्रिमुर्ती फ्लोअर मिलजवळ घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  तक्रारदार महिला धायरी परिसरात राहायला असून, २४ मार्चला संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास धायरी फाटा परिसरातून दुचाकीवर जात होती. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागून  आलेल्या चोरट्याने महिलेजवळून दुचाकी चालविली. त्यांच्या गाडीचा वेग कमी होताच, चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×