Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

मुंढव्यात घरफोडी, चार लाखांचा ऐवज चोरीला

मुंढव्यात घरफोडीचा घटना, चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला

Marathinews24.com

पुणे –  बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ११ एप्रिलला पहाटे चारच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगर परिसरात असलेल्या इमारतीत घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचा विनयभंग करून रिक्षाचालक पसार, पोलिसांकडून शोध सुरू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कुटूंबियासह मुंढव्यातील संभाजी चौकातील इमारतीत राहायला आहे. ११ एप्रिलला पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुसर्‍या दिवशी तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी तपास करीत आहेत.

धनकवडीतही घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

पुणे- बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ९ ते ११ एप्रिलला धनकवडीतील पार्वती हाईटसमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×