Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

लोणी काळभोर परिसरात अवैध धंद्याना उत वारंवार कारवाई तरीही जुगार अड्डे सुरू…

पोलीस कारवाई होऊनही लोणी काळभोरमध्ये जुगार अड्ड्यांचे प्रमाण वाढतेच

Marathinews24.com

पुणे –  शहरानजीक असलेल्या लोणी काळभोर परिसरात अवैध धंद्याना उत आला असून, जुगार अड्ड्यासह गावठी हातभट्टी दारुमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, परिसरात वारंवार कारवाई करूनही जुगार अड्डे आणि अवैध धंदे का सुरू राहतायेत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधिताना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.

मुंढव्यातील घरफोडीचा थरार; चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला – सविस्तर बातमी

लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीसह थेउरनजीक तुपे वस्तीजवळ दोन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही कारवाईत चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ८४ हजारांवर किंमतीचे जुगार साहित्य जप्त केले आहे. तुपेवस्ती परिसरात पोलिसांनी कारवाई करीत  राजेभाउ शेषराव मुसळे (वय ४०रा. थेउरगाव, हवेली) राम राजेंद्र गिरे (वय ३६ रा. गाढवेमळा, कुंजीरवाडी, हवेली ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६० हजारांची रोकड, जुगाराचे साहित्य असा ८२ हजार ५८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी काटेरी झुडपात पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच, पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

कदमवाक वस्तीनजीक लोणी स्टेशनजवळ सुरू असलेल्या जुगार अड्डयावर  पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून  १ हजार ७६५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दत्तात्रय नवनाथ मोहोळकर वय ५१ रा. म्हातोबा आळंदी, हवेली आणि तात्याराम महादेव ससाणे वय ५१ रा. माळीमळा, लोणी काळभोर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक बोबडे, उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, महेश चव्हाण, रवी आहेर, मल्हार ढमढेरे, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ, कांबळे, धुमाळ, कुंभार यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×