Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

“महिला आयोग आपल्या दारी” 15 ते 17 एप्रिल 2025 रोजी आयोजन

15 ते 17 एप्रिलदरम्यान ‘महिला आयोग आपल्या भेटीला’ विशेष उपक्रमाचे आयोजन

Marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी दि. १५ ते १७ एप्रिल, २०२५ या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तीन दिवस पुणे जिल्हा दौरा करणार आहेत. यावेळी पुणे शहरातील तक्रारींची सुनावणी मंगळवार, १५ एप्रिल रोजी, तर पुणे ग्रामीणसाठी जनसुनावणी बुधवार, १६ एप्रिल रोजी होणार आहे. या दोन्ही जनसुनावण्या नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सकाळी ११ वाजता होणार आहेत. तर गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे येथे सकाळी ११ वाजता पिंपरी-चिंचवडकरिता जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसुनावणीला जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×