Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

अरण्येश्वरमध्ये तरूणावर वार, एकाला अटक

दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला बेड्या; हडपसर पोलिसांची कारवाई

सहकारनगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – मोबाइलद्वारे संभाषण करीत थांबलेल्या तरूणाला गाठून त्याला बेदम मारहाण करीत वार करणार्‍या हल्लेखोराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास अरणेश्वरमध्ये घडली आहे. गणेश अनंत काथवटे (वय २६ रा. अरण्येश्वर) याला अटक केली आहे. तर लखन कांबळे (वय २०) याच्यासह साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गॅस सिलिंडरच्या स्फोटात मुलगा ठार, आई-वडील जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण अरण्येश्वरमध्ये राहायला असून, ३ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास तो दुर्गामाता मंदीराजवळ थांबला होता. त्यावेळी आलेल्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण करीत हातावर वार केला. हल्ल्यात तक्रारदार तरूण जखमी झाल्यानंतर टोळके पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एकाला अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अमलदार धोत्रे तपास करीत आहेत.

बालेवाडीत घरात शिरून २ लाखांचा ऐवज चोरला

पुणे- फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ३५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून १ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २८ मे ते ४ जून कालावधीत बालेवाडीतील नीव अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनोखळी व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला बालेवाडीतील नीव अपार्टमेंटमध्ये राहायला असून, २८ ते ४ जून कालावधीत अनोखळी व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून ३५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणाची माहिती होताच महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखेडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×