बचाव पथकाच्यावतीने ८ नागरिकांची सुखरूप सुटका
marathinews24.com
बारामती – तालुक्यातील होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काटेवाडी परिसरात ७, जळोची येथील १ आणि बारामती शहरातील १ असे एकूण ८ नागरिकांची बचाव पथकाच्यावतीने सुखरूप सुटका केली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.
हायड्रोक्लोरिक ऍसिड टँकर पलटी ; सुदैवाने जीवितहानी नाही – सविस्तर बातमी
नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित झालेल्या काटेवाडी या गावातील, अतिवृष्टीमुळे बाधित नारोळी, कोरोळी येथील काही कुटुंबे तसेच बारामती शहरातील तीन धोकादायक इमारतीमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
जळोची येथील एका व्यक्तीस बारामती नगरपालिका अग्निशमन दल व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीपात्र, कॅनॉल परिसरात जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.