सायबर चोरट्यांकडून तरूणाची साडेपाच लाखांची फसवणूक

ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला

अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ग्राहकांना वस्तूंच्या विक्रीसाठी प्रोत्साहित केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला ५ लाख ५८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २२ ते २७ एप्रिल कालावधीत वाकडेवाडीत घडली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरूणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जुन्या भांडणाच्या रागातून तरूणाच्या गळ्यातील ३ लाखांची सोन्याची चैन हिसकावली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण वाकडेवाडीत राहायला असून, २२ एप्रिलला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क केला होता. विविध वस्तूंची लक्झरी प्रॉडक्टची किंमतीबाबत ग्राहकांना प्रोत्साहित केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी दाखविले. त्यानुसार त्यांचा विश्वास संपादित करून सायबर चोरट्यांनी तरूणाला ऑनलाईनरित्या रक्कम पाठविण्यास सांगितले. तब्बल ५ लाख ५८ हजार रूपये वर्ग केल्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणासोबत संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×