पुण्यात नवविवाहितेचा विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यात नवविवाहितेचा विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पतीसह सासू, दिराविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पती,सासूच्या छळामुळे नवविवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोहगाव परिसरात घडली आहे. वडिलांना गाडी द्यायला सांग, अशी मागणी पतीने तिच्याकडे केली, तसेच सासूने ‘तू पांढऱ्या पायाची आहे’, असे टोमणे मारल्याची फिर्याद नवविवाहितेने विमानतळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

सायबर चोरट्यांकडून तरूणाची साडेपाच लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २३ वर्षीय नवविवाहितेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २३ वर्षीय तरुणीचा अजय याच्याशी २२ मे २०२२ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर सहा महिन्यांनी पती अजय याने किरकोळ कारणावरुन तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. ‘तु माहेरावरुन काय आणले ? तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही’, असे टोमणे मारले. ‘ मला पैशाची गरज आहे. तुझ्या वडिलांना मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास सांग’, असे अजयने तिला सांगितले. तरुणीने त्याला नकार दिला.

तेव्हा त्याने तिचा गळा दाबून पुन्हा मारहाण केली. दीर मनोज याने सुद्धा शिवीगाळ केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर २१ मे रोजी ‘पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले, तसेच तुलाही बाहेर काढेल. तू पांढऱ्या पायाची आहेस. तू घरात आल्यापासून शांतता नाही’, असे टोमणे सासू कमलने तिला मारले. छळ असह्य झाल्याने तिने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×