Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे 'शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादारीकरणासोबत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

marathinews24.com

पुणे – हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने शिवभक्तांसाठी ‘शिववंदना’ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर, ता. भोर येथे आयोजित करण्यात आला. यामध्ये शाहिरी-गायन-वादन सादरीकरणही करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी अनुभवली विमानशास्त्राची रोमांचक व अद्भुत सफर – सविस्तर बातमी 

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तमी’ १६४५ ला मावळ्यांसह परकीय राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, या घटनेला ३८१ वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभुमीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात रायरेश्वर भूमीचा समग्र शाश्वत विकास, केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत व महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘स्वराज्य सर्किट’ (किंवा शिव स्वराज्य सर्किट) मध्ये श्री क्षेत्र रायरेश्वर प्रेरणाभूमीचा समावेश व हिंदवी स्वराज्य स्तंभ श्री क्षेत्र रायरेश्वर येथे उभारण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केली. स्वराज्याचा कुंभमेळा अधिक शासकीय माध्यमातून आणि व्यापक लोकसहभागातून साजरा करण्याच्या निर्धार केला. भारताच्या-राज्याच्या विविध मंत्री महोदयांनी या सोहळ्याला, अभियानाला दिलेल्या शुभेच्छा व पाठीब्याचे वाचन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त शाहिरी-गायन-वादन सादरीकरणाचा शिव वंदना हा विशेष कार्यक्रम साजरा झाला. या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था- रायरेश्वर, बायोस्फिअर्स संस्था, ग्रामपंचायत रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. मोहन वामन, डॉ. सचिन अनिल पुणेकर, युवराज जेधे, मारुती आबा गोळे, दत्तात्रय जंगम, मौनीबाबा महाराज, रवींद्र कंक, प्रदीप मरळ, मंगेश शिळीमकर, सुनील चिकणे, राहुल पापळ, रवींद्र जंगम, सचिन देशमुख, रोहन इंगवले, अमित घरत यांच्या उपस्थितीत उपक्रम संपन्न झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×