Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यातील ६ ‘पोलिसांची’ गय नाही, खात्यातून काढणार -पोलिस आयुक्त अमितेश कुमार

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पीएसआय अजित बडे, रिलस्टार हिंगेसह वाघोली पोलिस ठाण्यातील अब्दागिरे,खाडेसह तिघांचा समावेश

marathinews24.com

पुणे – शहरातील मंगळवार पेठेतील नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून खंडणी उकळणारा पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, रिलस्टार पोलीस सोनाली हिंगे,आयटी अभियंता तरुण-तरुणींना ब्लॅकमेल करून १० हजार रुपये उकळणाऱ्या तिघा पोलिसांवर बडतर्फीची कारवाई होणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे – सविस्तर बातमी

पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांची गय केली जणार नाही. कोणी असे समजू नये की आम्ही येथे डोळ्यावर पट्टी बांधून बसलोय. कोणाच्याही चुकीला माफी नाही. त्यामुळे त्या सहा पोलिसांना पोलिस खात्यातून काढून टाकले जाईल असे अमितेश कुमार यांनी सांगितले. पीएसआय अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगे, पोलिस कर्मचारी सुदाम तायडे या तिघांनी एका प्राचार्यांना ब्लॅकमेल करून पोक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखून ७ लाख रुपयांची खंडणी उकळली. अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार येताच त्यांनी याबाबत मोठी ॲक्शन घेत या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, या तिघांच्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे. एवढी कारवाई त्यांच्याबाबत पुरेशी नसल्याचे सांगत अमितेश कुमार यांनी या तिघांवर बडर्फीची (पोलिस खात्यातून काढून टाकणे) कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

तर वाघोली पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे या तिघांनी आयटी अभियंता मित्र- मैत्रीणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत १० हजार रुपये उकळले. तरुणाला मारहाण देखील. पैसे उकळण्याचा हा प्रकार समोर येताच, तिघांवर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. अभियंता तरुण- तरुणीने पोलिस आयुक्ता अमितेश कुमारांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर उपायुक्त सोमय मुंडेंना याबात चौकशी करण्याचे अमितेश कुमारांनी आदेश दिले होते. त्यांच्या चौकशीत या तिघांनी रात्रपाळी कर्तव्यावर असताना, नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या कॉलची पुर्तता करत असताना तरुण-तरुणीला पोलिस ठाण्यात नेले. कॉलच्या अनुषंकाने जर असा काही प्रकार होता तर, त्या दोघांवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे होते. परंतू या पोलिसांनी असे न करता त्यांना धमकावून तरुणाकडून एका गॅरेजवाल्याच्या फोन पेवर दहा हजार रुपये घेतले.

तिघेही झाले पसार

खंडणीचा गुन्हा दाखल होताच पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिल्सस्टार पोलिस सोनाली हिंगे, सुदाम तायडे हे तिघे पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे तिघांवर सद्या तरी अटकेची तलवार टांगती आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×