पुणे शहरात अवजड वाहनांना वाहतूक बंदी

१३ मध्यरात्री ते  १४  एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत बंदी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने वाहतूक बदल

Marathinews24.com

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (दि. १४) शहरातील विविध भागात वाहतूक बदल केले आहेत. त्यासोबत आता अवजड वाहनांनाही वाहतूकीला बंदी घातली आहे. १३ एप्रिलला मध्यरात्री बारा ते १४ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यत्त मध्यवर्ती  भागात अवजड वाहनांना नो एन्ट्री केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस  उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
शहरभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान,  पुणे स्टेशन परिसर, अरोरा टॉवर, विश्रांतवाडी चौक ते कळस फाटा व कळसफाटा ते विश्रांतवाडी चौक परिसरात जयंतीनिमित्ताने कार्यक्रम होणार आहेत.  मिरवणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे दोन्ही बाजूस गर्दी होते. त्यापार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, १० पेक्षा जास्त चाकी जड / अवजड वाहने, कंटेनर, ट्रेलर बल्कर, मल्टी अ‍ॅक्सल इत्यादी वाहनांना पुणे बेंगलोर महामार्ग वगळून शहरभरात २४ तास बंदी घालण्यात आली आहे.

२४ तास जड वाहनांना मिळणार नाही

 थेऊर फाटा,लोणीकाळभोर पासुन पुढे,  हॅरीष ब्रिज, खडकी,  बोपखेल फाटा, विश्रांतवाडी,  राधा चौक, बाणेर,  नवले ब्रिज, वारजे, कात्रज चौक, कात्रज, खडीमशीन चौक, कोंढवा, मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, खराडी बायपास चौक, रविदर्शन चौक,  भैरोबानाला चौक या परिसरातून अवजड वाहनांना प्रवासाला पुर्णतः बंदी घातली आहे.  वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून, गैरसोय टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील विविध भागात वाहतूक बदल केले आहेत. प्रामुख्याने पुणे स्टेशन, विश्रांतवाडी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दांडेकर पूल परिसरात वाहतूक बदल केले आहेत. त्यासोबतच अवजड वाहनांना एक दिवस पुर्णतः प्रवेशास बंदी घातली आहे. वाहन चालकांनी वाहतूक अमलदारांना सहकार्य करावे.
अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर

मनोरंजन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top