Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वैमनस्यातून दोघांवर शस्त्राने वार

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दहा ते बारा जणांविरुद्ध गु्नहा दाखल करण्यात आला.
टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मुकेश नामदेव पोटे (वय ४२, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) आणि त्याचा मित्र जखमी झाला. पोटे याने दिलेल्य फिर्यादीनुसार, सुमीत पवार, विजय हुलावळे, निलेश पवार. भैय्या पवार, किरण पवार (सर्व रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोटेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

परवानगीशिवाय मिरवणूक काढली; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे आणि त्याचा मित्र रविवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास जनता वसाहत परिसरातून निघाले होते. त्या वेळी वाघजाई मित्र मंडळाजवळ पूर्वी झालेल्या भांडणातून आरोपींनी पोटे आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून टोळक्याने पोटे आणि मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बी. एम. माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×