हडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

डिजिटल लॉक उघडून २७ लाखांचे दागिने लांबवले

पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपीला पकडले

marathinews24.com

पुणे – केबल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर हडपसर पोलीस त्याला शासकीय वाहनाने घेऊन जात होते. सिग्नलला गाडीचा वेग कमी झाल्यानंतर आरोपीने बेड्यासह उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दक्ष पोलिसांनी अवघ्या काही वेळातच आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. धावपळीचा फिल्मी स्टाईल थरार घडल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. अब्दुल तोफिच शेख (वय 32, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटका – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यात वायर चोरीचा गुन्हा दाखल असून प्रकरणातील आरोपी अब्दुल तोफिच शेख (वय ३२, रा. साडेसतरा नळी, हडपसर) याला पोलिसांनी ४ मे रोजी अटक केली होती. मंगळवारी ( दि.५) त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ७ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला घेऊन शासकीय वाहनाने हडपसर पोलीस ठाण्याकडे जात होते. गांधी चौक, हडपसर सिग्नलजवळ गाडी थांबली होती. याच वेळी सिग्नल सुटल्यानंतर गाडीचा वेग कमी असल्याचा फायदा घेत आरोपी शेखने हातातील बेड्यासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पर पोलिसांनी लगेचच आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. घटनेनंतर आरोपीस सुरक्षेच्या दृष्टीने हडपसर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×