Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

भिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटका

जांभूळवाडी रोड परिसरात थरारक घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील कात्रज परिसरातील जांभूळवाडी रोडवरील गोविंद बेसिल सोसायटीत मंगळवारी (दि.५ ) धक्कादायक घटना घडली. सात वर्षांच्या मुलगा दोन भिंतींच्या अरुंद जागेत अडकला असल्याची माहिती कात्रज अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी धाव घेत।मुलाची सुटका केली. रणवीर चेतन चव्हाण (वय ७) असे सुटका केलेल्या मुलाचे नाव आहे.

कोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीला – सविस्तर बातमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात दोन भिंतींच्या मधोमध पडून एक मुलगा अडकला असल्याची।माहिती मिळाली.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य सुरू केले. हायड्रॉलिक ब्रेकर आणि घनाच्या सहाय्याने भिंतीचा काही भाग तोडण्यात आला. तसेच बोल्ट कटरच्या मदतीने भिंतीतील लोखंडी सळ्या कापून मुलाला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत मुलाची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्यात प्रभारी उप अग्निशमन अधिकारी संतोष भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन किरण पाटील, मयूर काटे, प्रशांत कुंभार आणि चालक बंडू गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक नागरिकांकडून अग्निशमन दलाच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×