Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीला

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

दूरध्वनी सेवा विस्कळीत

marathinews24.com

पुणे – बीएसएनएलची केबल चोरीला गेल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे. केबल चोरीमुळे कोथरूड भागतील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली होती. याबाबत कैलास माधवराव पायमोडे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायमोडे हे एरंडवणे भागातील बीएसएनएल कार्यालयात मंडल उपअभियंता आहेत. देखभाल दुरुस्ती करणार्‍या कर्मचार्‍यांनी कर्वे पुतळा चौकातील जेली फिल्ड कॉपर केबल तुटल्याचे पाहिले. ही केबल तुटल्यामुळे या भागातील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर देखभाल दुरुस्ती करणार्‍या कर्मचार्‍यांनी तपासणी केली. कोथरूडमधील मृत्युंजय मंदिर चौकातील बीएसएनलच्या भूमिगत केबलची तपासणी केली. तेव्हा डक्टमधील केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कोथरूडमधील कर्वे पुतळा परिसरातून केबल चोरीला गेली होती. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी चोरट्यांना अटक केली.

खासगी कंपनीतून तांब्याची तार चोरीला

हडपसरमधील खासगी कंपनीच्या आवारातून २ लाखांची तांब्याची तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत बापू ज्ञानदेव माने (वय ४४, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माने हे खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहेत. हडपसरमधील माळवाडी परिसरात खासगी कंपनी आहे. २ मे रोजी कंपनीच्या आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी दोन लाख २० हजारांची तांब्याची तार चोरून नेली. पोलीस कर्मचारी खटके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×