टेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरी

गुन्हे शाखेच्या युनीट सहाने फुरसुंगी परिसरातून केली अटक

marathinews24.com

पुणे – टेम्पो चोरणार्‍या सराईत टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने फुरसुंगी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेचार लाख रूपयांचा टेम्पो, दोन मोबाइल असा ४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कन्हैयासिंग कालुसिंग टाक (वय ३३ रा. गाडीतळ, हडपसर) आणि राजेशसिंग नानकसिंग दुधाणी (वय ४८ रा. गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड हे पथकासह फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे यांना टेम्पो चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने फुरसुंगी परिसरातील पावर हाउसजवळून दोघांना ताब्यात घेतले. आरोपी टाक आणि दुधाणी यांनी चिखली परिसरातून टेम्पो चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी राजेंद्र मुळिक, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×