Breking News
पुण्यात मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छादकौटुंबिक वादातून साडूचा केला खून, मृतदेह वरंधा घाटात फेकलाधक्कादायक…सेक्स करतानाचे व्हिडिओ मित्रांना पाठवलेशेअरच्या बदल्यात दिला थोडा नफा, नंतर २६ लाखांचा घातला गंडापीएमपीएल बसप्रवासात सोन्याच्या पाटल्या चोरीलारस्ता ओलांडणार्‍या तरूणाला टेम्पो चालकाने चिरडलेकेंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘मॉकड्रिल’-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुणे : सराईत दुचाकी चोरट्याला अटक, दोन दुचाकी जप्तपुणे जिल्ह्यात ३ ठिकाणी होणार मॉकड्रिल,ब्लॅक आउट नाहीगांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या सराईताला अटक, वानवडी पोलिसांची कामगिरी

दारू आणून न दिल्याने तरुणाचा केला खून

काशेवाडी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – दारू आणून न दिल्याच्या रागातून दोघा जणांनी तरुणाचे डोके भिंतीवर आपटून त्याचा खून केला आहे. ही घटना ३ मे ला रात्री साडे आठच्या सुमारास भवानी पेठेतील काशेवाडीत घडली. गोपाल आचार्य (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमीर शेख आणि दानिस अली शेख (दोघेही रा. काशेवाडी ) यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.जयराम आचार्य ( वय ५१) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

गोवंश तस्करीचा पर्दापाश, २०० किलो गोमांस जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयराम आचार्य हे कुटूंबियासह काशेवाडीत राहायला आहेत. त्यांचा मुलगा गोपाल हा ४ मे रोजी कासेवाडीत होता. त्यावेळी वस्तीवरील आरोपी अमिर शेख याने त्याला दारू आणण्यासाठी सांगितले होते. मात्र, गोपालने त्याला नकार दिला होता. त्याच रागातून आरोपी दानिशने गोपालला घराबाहेर बोलावून घेतले. तू माझ्या चाचाला दारू आणून का दिली नाही, अशी विचारणा करून त्याचे डोके भिंतीवर आपटले. वाद विकोपाला जाताच अमीर शेख व दानिस शेख यांनी गोपालला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गोपालला वडील जयराम यांनी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, मारहाणीत गोपालच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोपालच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top