Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बसस्थानकात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

शिवाजीनगरमधील घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन महिलांचे दागिने चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे वारंवार घडणार्‍या चोरीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशी महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कामानिमित्त घराबाहेर पडताना प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावी जाणार्‍या नागरिकांची स्वागरेट, शिवाजीनगर एसटी स्थानकासह रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. नेमकी संधी साधून गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून महिलांचे दागिने चोरून नेले जात आहेत.

पुणे : तरुणाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक – सविस्तर बातम

शहरातील मध्यवर्ती शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील पीएमपीएल बसस्थानकात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ४ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मावळातील बेंबळओहळमध्ये राहणार्‍या ४८ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत बसस्थानकात गर्दीचा फायदा घेउन लुटमारीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची मावळ तालुक्यातील बेंबळओहळ गावची रहिवाशी आहे. ४ एप्रिलला कामानिमित्त महिला शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील पीएमपीएल बसस्थानकात थांबली होती. इच्छितस्थळी जाण्यासाठी बस आल्यामुळे महिला बसमध्ये प्रवेश करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. काही वेळानंतर महिलेला दागिन्याची चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी जवळच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×