Breking News
भेदाभेद विसरून बंधुभावाने राहा – पोलिस आयुक्त अमितेश कुमारजलसंधारण दिन विशेष – जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया – मंत्री संजय राठोडपुणे पोलीस आयुक्तांनी डीजेंना वाजवले, डेसिबलही तपासलेमतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्नपुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी!आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरतीलोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीपबंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेशपुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटक

मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्न

मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्न

मतदार नोंदणी सुनावण्यांचे बारकाईने नियोजन करा – मिनल कळसकर, सुनावणीसाठी आवश्यक सुविधा, मनुष्यबळ व तांत्रिक बाबींची पूर्वतयारी करण्याच्या सूचना

marathinews24.com

पुणे – मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्राप्त दावे व हरकतींवर दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावण्यांच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबींचा विचार करून बारकाईने नियोजन करावे, अशा सूचना उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिल्या.

पुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी! – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात ग्रामीण भागातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना सुनावणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, राजगड, मुळशी व मावळ तालुक्यांचे प्रांताधिकारी उपस्थित होते.

श्रीमती कळसकर म्हणाल्या, सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना मतदान केंद्रांचे विभाग वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी योग्य एका मतदान केंद्रावर सुनावणीची व्यवस्था करावी. एका सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे १० गावे असल्यास संबंधित गावांच्या मतदारांना सोयीचे होईल अशा जवळच्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक दिवस याप्रमाणे सुनावणीची तारीख, ठिकाण व वेळ निश्चित करावी. मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी आयोजित करावयाची असल्यास ते ठिकाण मतदाराच्या पत्त्यापासून दोन किलोमीटरच्या अंतरात असेल, याची दक्षता घ्यावी.

सुनावणीसाठी आवश्यक साहित्य, इंटरनेट सुविधा, संगणक, प्रिंटर आदींची पूर्वतयारी करावी. सुनावणीच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.

सुनावणीच्या वेळी सहा पथके कार्यरत ठेवावीत. यामध्ये गणना पत्रक काढून देणे, रोजनामा लिहिणे, मतदारांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, सन २००२ च्या मतदार यादीत नाव तपासणे तसेच नातेवाईकांच्या नावासोबत मॅपिंग करणे, सुनावणीतील निर्णयाच्या दोन प्रती तयार करणे, त्यापैकी एक प्रत मतदारास देणे व दुसरी प्रत गणना पत्रकासोबत संबंधित फाईलमध्ये ठेवणे, मतदारांनी सादर केलेली कागदपत्रे तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय ऑनलाइन अपलोड करणे आदी कामांचा समावेश करावा. तसेच मतदारांनी सादर केलेली कागदपत्रे, मूळ आदेश, रोजनामा, नोटीस आदी अभिलेखांचे योग्य पद्धतीने जतन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सुनावणीस उपस्थित राहताना मतदारांनी मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सहा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सादर केलेली कागदपत्रे शंकास्पद आढळल्यास संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद पुणे, पासपोर्ट कार्यालय, पुणे तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडे पाठवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

प्रशिक्षणास जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, राजगड, मुळशी व मावळ तालुक्यांचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच तांत्रिक सहायक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×