४ लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त
marathinews24.com
पुणे – मेफेड्रॉन (एम.डी) विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघा तस्करांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून १७ ग्रॅम एमडी, दुचाकी, महागडा मोबाइल असा ४ लाख १३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. क्रिश राजु परदेशी (वय २१ रा. आनंदनगर, गंगाधाम कोंढवा रोड, मार्वेâटयार्ड) अक्षय उस्नप्पा हादीमनी (वय २० रा. प्रसादनगर, लेननंबर ७, न्यु आनंदनगर सोसायटी बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
अंमली पदार्थविरोधी पथक एकच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे १९ ऑगस्टला पथकासह हद्दीत गस्त घालत होत्या. त्यावेळी पोलीस अंमलदार अमरनाथ लोणकर यांना रेकॉर्डवरील क्रिश परदेशी आणि अक्षय हादीमनी यांनी एमडी विक्री सुरु केल्याची माहिती मिळाली. ते दोघेही मार्वेâटयार्डातील गंगाधाम चौकात ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशियत दुचाकीस्वार दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जातून विक्रीसाठी आणलेला ३ लाख ३८ हजारांचा एमडी जप्त केले. २५ हजारांची दुचाकी, ५० हजारांचा मोबाइल असा ४ लाख १३ हजारांचा ऐवज जप्त केला.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील असून त्यांच्याविरूध्द बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासह इतर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी एमडी कोठून आणले आहे, ते ड्रग्जची विक्री कोणाला करणार होते, तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त हसन गौहर, एसीपी शंकर खटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे,उपनिरीक्षक योगेश कोतकर, आशा भिंगारे, विठ्ठल साळुंखे, अमरनाथ लोनकर, अमोल सरडे, अतुल क्षिरसागर, तुषार साळुंखे, मंगेश गुंड, संजय राजे, विशाल भिलारे, जानव्ही सुर्यवंशी यांनी केली.





















