Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

‘प्रेरणापथ’ उपक्रमातून बंदी बांधवांना मूर्तीकलेचे प्रशिक्षण; पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या माध्यमातून पुनर्वसनाचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे – रागाच्या भरात किंवा नकळत झालेल्या चुकीची शिक्षा भोगत असतानाच बंदी बांधवांमधील चांगला माणूस जागवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे. याच प्रयत्नांना कलात्मकतेची जोड देत बंदी बांधवांच्या हातून यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत.

चाकण परिसराची कचराकोंडी फुटली; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमांतर्गत बंदी बांधवांना गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या कलागुणांना वाव देतानाच आत्मविश्वास वाढवणे, प्रायश्चित्ताची भावना सकारात्मक कृतीत रूपांतरित करणे आणि समाजाशी पुन्हा नाते जोडण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

व्यावसायिक कलाकारांच्या कलाकृतींना लाजवतील अशा सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती या प्रशिक्षणातून तयार झाल्या आहेत. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, विराज खटावकर, पुंडलिक खलोलकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदी बांधवांना मूर्तीकलेचे मार्गदर्शन केले.

बंदी बांधवांनी साकारलेल्या या गणेशमूर्ती समाजाने भक्तिभावाने स्वीकारून आपल्या घरी प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन कारागृह सुधार सेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, महानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ आणि अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम यांनी केले आहे. या उपक्रमातून बंदी बांधवांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यातील सकारात्मक परिवर्तनाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची विक्री गायत्री क्लिनिक, खडक माळ, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी रोड, पुणे येथील स्टॉलवर करण्यात येत आहे. शाडू मातीपासून तयार केलेल्या या मूर्ती पर्यावरणपूरक असून, त्यांची खरेदी करून नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘बाप्पा’च्या मूर्तीसोबत परिवर्तनाची आशाही घरोघरी पोहोचावी, हा या उपक्रमाचा संदेश आहे. समाजातील नागरिकांनी पुढे येऊन बंदी बांधवांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या पुनर्वसनाच्या या प्रयत्नांना पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×