गणेशोत्सव-दहीहंडीपूर्वी आयुक्तालयात डीजेची प्रत्यक्ष चाचणी
marathinews24.com
पुणे – शहरात आगामी गणेशोत्सव व दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट डीजे वादकांना बोलावून घेत साउंडची टेस्टिंग तपासली. गुरूवारी दि.२० पोलीस आयुक्तालयात डीजेच्या आवाजाची (डेसिबल लेव्हल) प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष आवाजाची नोंद घेण्यात आली. सणउत्सवात आवाजाचे प्रमाण किती असेल, याचाही आढावा घेण्यात आला.
मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्न – सविस्तर बातमी
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणाचे नियम व कायदेशीर मर्यादेचे पालन करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर ध्वनी निर्बंध करता येईल का, डीजेला बंदी घालता येईल का, अशाप्रकारची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. त्यानुसार याप्रकरणी गणेश मंडळांसह डीजे वादकांसाठी सातत्याने बैठक घेण्यात येत आहे. मात्र, याप्रकरणात आम्ही नियमांचे पालन करू, आवाजाची मर्यादा कमी ठेउ असे मंडळांकडून सांगण्यात आले. मात्र, तरीही पोलिसांकडून अद्यापही डीजे वादनाचा निर्णय घेण्यात आला नाही.
गाणं वाजवायला लावलं, पोलीस आयुक्त जागेवर थांबले
सण-उत्सवात कर्णकर्कश डीजे वाजवणार्यांमुळे अनेक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर डीजे वादकांवर बंदी आणावी, ध्वनी प्रदूषण होणार नाही, यासाठी पोलिसांनी पाउले उचण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत सहायक पोलीस आयुक्त विवेक पवार यांच्या आदेशानुसार डीजे वादकांनी थेट आयुक्तालयात डीजेवर गाणं वाजवले. विविध गाण्यातील चाल-लयीनुसार आवाजातील पातळीही कमी-जास्त करण्यात आली. यावेळी आवाजाचा डेसीबल नोंदवला असून, आगामी दोन ते तीन दिवसांत डीजे वादकांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



















