Breking News
भेदाभेद विसरून बंधुभावाने राहा – पोलिस आयुक्त अमितेश कुमारजलसंधारण दिन विशेष – जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया – मंत्री संजय राठोडपुणे पोलीस आयुक्तांनी डीजेंना वाजवले, डेसिबलही तपासलेमतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्नपुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी!आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरतीलोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीपबंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेशपुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटक

पुणे पोलीस आयुक्तांनी डीजेंना वाजवले, डेसिबलही तपासले

पुणे पोलीस आयुक्तांनी डीजेंना वाजवले, डेसिबलही तपासले

गणेशोत्सव-दहीहंडीपूर्वी आयुक्तालयात डीजेची प्रत्यक्ष चाचणी

marathinews24.com

पुणे – शहरात आगामी गणेशोत्सव व दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट डीजे वादकांना बोलावून घेत साउंडची टेस्टिंग तपासली. गुरूवारी दि.२० पोलीस आयुक्तालयात डीजेच्या आवाजाची (डेसिबल लेव्हल) प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष आवाजाची नोंद घेण्यात आली. सणउत्सवात आवाजाचे प्रमाण किती असेल, याचाही आढावा घेण्यात आला.

मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्न – सविस्तर बातमी 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणाचे नियम व कायदेशीर मर्यादेचे पालन करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर ध्वनी निर्बंध करता येईल का, डीजेला बंदी घालता येईल का, अशाप्रकारची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. त्यानुसार याप्रकरणी गणेश मंडळांसह डीजे वादकांसाठी सातत्याने बैठक घेण्यात येत आहे. मात्र, याप्रकरणात आम्ही नियमांचे पालन करू, आवाजाची मर्यादा कमी ठेउ असे मंडळांकडून सांगण्यात आले. मात्र, तरीही पोलिसांकडून अद्यापही डीजे वादनाचा निर्णय घेण्यात आला नाही.

गाणं वाजवायला लावलं, पोलीस आयुक्त जागेवर थांबले

सण-उत्सवात कर्णकर्कश डीजे वाजवणार्‍यांमुळे अनेक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर डीजे वादकांवर बंदी आणावी, ध्वनी प्रदूषण होणार नाही, यासाठी पोलिसांनी पाउले उचण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत सहायक पोलीस आयुक्त विवेक पवार यांच्या आदेशानुसार डीजे वादकांनी थेट आयुक्तालयात डीजेवर गाणं वाजवले. विविध गाण्यातील चाल-लयीनुसार आवाजातील पातळीही कमी-जास्त करण्यात आली. यावेळी आवाजाचा डेसीबल नोंदवला असून, आगामी दोन ते तीन दिवसांत डीजे वादकांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×