Breking News
भेदाभेद विसरून बंधुभावाने राहा – पोलिस आयुक्त अमितेश कुमारजलसंधारण दिन विशेष – जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया – मंत्री संजय राठोडपुणे पोलीस आयुक्तांनी डीजेंना वाजवले, डेसिबलही तपासलेमतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्नपुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी!आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरतीलोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीपबंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेशपुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटक

भेदाभेद विसरून बंधुभावाने राहा – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

कोंढव्यात राष्ट्रीय एकतेचा संदेश

marathinews24.com

पुणे – विविधतेत एकता हीच आपली खरी ताकद आहे. धर्मभेद विसरून प्रेम आणि बंधुभावाने आपण राहिले पाहिजे. हिंदू-मुस्लिम एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. सर्वांना एकतेच्या शुभेच्छा,” असा संदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. जात, धर्म आणि पंथाचे भेद विसरून समाजात शांतता, सलोखा आणि बंधुभाव कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कोंढवा येथे आयोजित ‘पुणे राष्ट्रीय एकता कॉन्फरन्स’मध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सुमारे ६०० ते ७०० नागरिक उपस्थित होते.

पुणे पोलीस आयुक्तांनी डीजेंना वाजवले, डेसिबलही तपासले – सविस्तर बातमी

पुणे राष्ट्रीय एकता कॉन्फरन्सचे आयोजन शांतता, आपसी भाईचारा आणि समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. कार्यक्रमाला पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विविध धर्मांतील नागरिकांनी एकत्र येऊन देशाची एकता आणि अखंडता मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र इंगळे, माजी महापौर प्रशांत जगताप, कोंढवा हद्दीतील नगरसेवक हाजी गफूर पठाण, मौलाना अब्दुल, मौलाना शाकीर, जुबेर जकाती, आतिफ खोकर, कारी मुश्ताक, मुफ्ती अहमद, मुफ्ती आफताब, शफकत अहमद, मौलाना शहाबुद्दीन, अब्दुल हमीद इनामदार, दिलशाद अंसारी, मुबश्शीर शेख, मौलाना नईम, मौलाना अफताब उपस्थित होते.

कारीश शेख, कारी इमरान, मौलाना नदीम, अजमल अंसारी, मौलाना इरफान, इफ्तेखार अंसारी, नाजिफ मोहम्मद, उस्मान कादरी, बब्बीभाई, मुजफ्फर शेख, संजय लोणकर, धोंडबा थोरात, गणेश म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कोंढवा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत कार्यक्रम शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×