पुण्यातील शिवणे परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात महिलेच्या पिशवीतून १० लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवणे भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाला पार्टटाईम जॉबचे आमिष, जेष्ठाला जादा परताव्याची हुल पडली महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुंबईतील ताडदेव भागात राहायला आहे. त्या त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या डोहाळ जेवण कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यांची बहीण शिवणे भागातील आयर्क रेसीडन्सी सोसायटीत राहायला आहे. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम एका हाॅलमध्ये गेल्या महिन्यात २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. तेथील कार्यक्रम आटाेपल्यानंतर त्या शिवणे भागात राहणाऱ्या बहिणीच्या घरी आल्या. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला.तक्रारदार महिला मुंबईला गेल्या. त्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे तपास करत आहेत.