युद्ध हा पर्याय नाही, चर्चेतून मार्ग शोधले पाहिजेत – माजी लष्करप्रमुख डॉ मनोज नरवणे
marathinews24.com
पुणे – युद्ध हे रोमँटिक नसून ते आपले बॉलिवूड चित्रपट नाही. हा खूप गंभीर विषय असून, हिंसाचार हे युद्धावर उत्तर असू शकत नसून, ती फार शेवटची गोष्ट आहे. आमचे पंतप्रधान यांनाही हे युद्धाचे युग नाही असे म्हटले आहे. त्यामुळे हिंसाचार हे उत्तर असू शकत नाही, चर्चेतून मार्ग शोधले पाहिजेत असे मत माजी लष्करप्रमुख जनरल डॉ. मनोज नरवणे यांनी व्यक्त केले आहे. आयसीएमएआय पुणे चाप्टर डायमंड जुबली कार्यक्रमानिमित्ताने कलमाडी हायस्कूमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नीरज जोशी, चैतन्य मोहरीर, निलेश केकान, किशोर देसाई, अमित आपटे, शिल्पा आपटे, संजय भार्गवे उपस्थित होते.
डॉ. नरवणे म्हणाले, हिंदुस्थान- पाकमध्ये मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सिंदूर ऑपरेशनसह एअर स्ट्राईकद्वारे लष्कराने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले आहेत. त्यादरम्यान आपल्याही सीमारेषेजवळ काहीजणांच्या कुटूंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला. त्याचा परिणाम त्यांच्या संपुर्ण पिढीवर होत असतो. आता मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. दरम्यान, तरीही लोक मला विचारतात तुम्ही ऑल आउट युद्धासाठी का जात नाहीत. लष्करी नोकरदार या नात्याने माझ्या मते युद्ध हा माझा पहिला पर्याय असू शकणार नाही. माझा पहिला पर्याय हा राजशिष्टाचार असेल. चर्चेतून प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणारा असेल. राष्ट्रीय सुरक्षाबाबत बोलताना एनर्जी, पाणी, आरोग्य सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील आठवड्यात आपन मॉक ड्रिल अनुभवत विविध यंत्रणांची तयारी पाहिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी याकाळात संपूर्ण देशातील वेगवेगळ्या मंत्रालयीन सचिवांसोबत चर्चा करीत एकतेचा संदेश देत आहे. दुसरीकडे सरकारने आपल्या सुरक्षा यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे आपण ताकदवान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किशोर देसाई, आजच्या जीवनात भक्ती खूप महत्त्वाची असून तीन गोष्टी आवश्यक आहे. ज्ञान, कर्म, भक्ती आयुष्यात महत्वाची आहे. जीवनात ८० टक्के आनंद आहे, मात्र आपण ते विसरत चाललो आहे. त्यामुळे आपण स्वतः ला ओळखले पाहिजे. मन ओळखणे, खुशी कशात आहे हे ओळखणे गरजेचे आहे. खरा आनंद कुठे आहे, एकमेकांना मदत करण्यात आनंद शोधला पाहिजे. ध्यान धारणेसह मनाला शांत करण्याची कला शिकली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यावासायिक किशोर देसाई म्हणाले १९९८ साली रॉकेटमध्ये इंधन भरने आपल्या देशात शक्य नव्हते. ते पंप आम्ही तयार केले आणि संबंधित विभागाला वापरायला दिले. आपणही देशासाठी काहीतरी करू शकतो, फक्त माणसाच्या मनातुन येणारी इच्छा महत्वाची असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.