Breking News
रात्रशाळेतील जिद्दीचा विजय; पूना नाईट हायस्कूलचा 89.47 टक्के निकालसैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्नशेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्यसायबर चोरट्यांकडून महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूककेरळ सहलीच्या आमिषाने पर्यटकांची फसवणूकबी.एससी – एचएचए अभ्यासक्रमाकरीता ३१ मेअखेर अर्ज करण्याचे आवाहनशिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जयतु शंभू’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनमुलांच्या भांडणावरून सुरू झालेला वाद फ्री स्टाईल हाणामारीवर पोहोचलापुण्यात मुसळधार पावसामुळे ५ ठिकाणी झाडे काेसळली

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

लोणी काळभोरमधील दुर्घटना, सहप्रवासी पोलीस उपनिरीक्षक जखमी

marathinews24.com

पुणे – उपजिल्हाधिकारी असलेल्या मित्राच्या विवाह समारंभातून घरी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा दुभाजकावर आदळून मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी पोलीस उपनिरीक्षक तरुण जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण पुण्यातील ’स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी

समाधान संभाजी भिटे (वय ३१, रा. नीर निंबगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी उपनिरीक्षक मयूर सुनील डोंगरे (वय २९) हे जखमी झाले आहे. डोंगरे मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक आहेत. समाधान भिटे आणि त्यांचा भाऊ सध्या मंगळवार पेठेत राहायला होते. ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान आणि मयूर यांचा मित्र उपजिल्हाधिकारी आहे. त्याचा विवाह शनिवारी (१० मे) लोणी काळभोर भागातील सोरतापवाडीतील एका मंगल कार्यालयात पार पडला. शुक्रवारी (९ मे) रात्री हळदीचा कार्यक्रम होता. समाधान आणि मयूर हे शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरुन घरी निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट परिसरात भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघातात समाधान आणि सहप्रवासी मयूर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना समाधान यांचा मृत्यू झाला. समाधान यांचा अपघाती मृ्त्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत शाेककळा पसरली. त्यांच्याबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सहकारी मित्रांना धक्का बसला.समाधान यांच्या कुटुंबीयांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. शोकाकूल वातावणात इंदापूर तालुक्यातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top