Breking News
फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलवून मारहाण करुन लुटीचा प्रयत्नआपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलहडपसरमधील हॉटेलच्या शौचालयात महिलेचे चित्रीकरण; आरोपी अटकेतपुण्यातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाहीपोलीस तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर केला गोळीबारमहाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य – उद्योग मंत्री उदय सामंतस्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला अटकपुण्यात तब्बल १ कोटी १३ लाखांवर गुटखा, सिगारेट जप्तशासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरणक्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूक

व्हॉटसअ‍ॅप डीपीवर स्टेटस ठेउन केली आत्महत्या

वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांने जीवन संपविले

marathinews24.com

पुणे – व्हॉटसअ‍ॅप मेसेद्वारे आई-वडिलांना सुसाईट नोट पाठविल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने स्वतःच्या व्हॉटसअ‍ॅप डीपीवर स्टेटस ठेउन चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना १२ मे रोजी वानवडीतील ए.एम.एम सी कॉलेजमध्ये उघडकीस आली आहे. वर्षभरापासून अभ्यासक्रमामुळे डिप्रेशनमुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. उत्कर्ष महादेव शिंगणे (वय २० रा. भाग्यनगर बीड सध्या शिक्षण भोपाळ)

थार वाहन चालकाचा थरार, ५ दुचाकींना दिली धडक; चालक पोलिसांच्‍या ताब्‍यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष हा मूळचा बीडमधील रहिवाशी होता. तो भोपाळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. कॉलेजमधील गेम्ससाठी तो ८ मे रोजी पुण्यातील ए एफ एम सी महाविद्यालयात आला होता. दरम्यान, मागील वर्षभरापासून अभ्यासाच्या त्रासामुळे तो नैराश्यात गेला होता. त्यामुळे त्याच्यावर पुण्यासह भोपाळमध्येही वैद्यकीय उपचार सुरू होते. दरम्यान, १२ मे ला पहाटेच्या सुमारास त्याने आई-वडिलांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे मेसेज करून आत्महत्या करणार असल्याची नोट पाठविली. त्यानुसार शिंगणे कुटूंबियांनी तातडीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तोपर्यंत उत्कर्षने स्वतःच्या व्हॉटसअ‍ॅप डिपीवर आत्महत्या करीत असल्याचे स्टेटस अपलोड केले.

महाविद्यालयातील मुलांच्या हॉस्टेलमध्ये बाथरूमध्ये कमोडवर बसलेल्या अवस्थेत त्याने स्वतःवर चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली. कंट्रोल कॉलनुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बाथरूममध्ये रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला एएफएमसी डॉक्टरांच्या मदतीने तपासले. संबंधित डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तातडीने आय कारला पाचारण करीत संपुर्ण पुरावे एकत्रित केले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी धाव घेतली होती.

ऑनलाईनरित्या खरेदी केला चाकू

वैद्यकीय शिक्षण घेत असताना अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे उत्कर्षवर मागील वर्षभरापासून वैद्यकीय उपचार सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार त्याने ऑनलाइन चाकू खरेदी केला होता. त्यानंतर त्याने चाकूच्या साह्याने छातीमध्ये स्वतःस भोसकून घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने स्वतःच्या व्हाट्सअप डीपीवर सुसाईड नोट ठेवली होती. याप्रकरणी प्राथमिक दृष्ट्या कोणताही संशयाचा प्रकार नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top