Breking News
कोथरूडमध्ये ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीकडून बंदबीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

क्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूक

क्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूक

अज्ञात मोबाइलधारकासह सायबर चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – बँक अधिकार्‍यांसाठी खास क्रेडीट कार्ड योजना असल्याचे सांगून, सायबर चोरट्याने एका जेष्ठ नागरिकाकडून बँकखात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर त्यांना एपीके फाईल पाठवून फाईलला क्लिक करण्यास सांगून तब्बल ९ लाख ४६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ९ ते १६ मे कालावधीत कोथरूड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६९ वर्षीय नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइलधारकासह सायबर चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

जबरी चोरीप्रकरणी ५ महिन्यांपासून फरार आरोपीला बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरूडमध्ये राहायला असून, ते बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ९ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून बँक अधिकार्‍यांसाठी खास क्रेडीट कार्डची योजना असल्याची बतावणी केली. सायबर चोरट्याने पाठविलेल्या अ‍ॅडला क्लिक करण्यास सांगून माहिती भरण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर कार्डसाठी व्हेरिफिकेशन महत्वाचे असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँक खात्याची संपुर्ण माहिती सायबर चोरट्याने घेतली.

त्यांचा विश्वास संपादित करून सायबर चोरट्याने व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर एपीके फाईल पाठविली. संबंधित फाईलला क्लिक करण्यास सांगून ऑनलाईनरित्या ९ लाख ४६ हजारांची फसवणूक केली आहे. बँक खात्यातून रक्कम वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर तक्रारदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top