Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Dr. Panjabrao Deshmukh Hostel Allowance : वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढ करा; विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Dr. Panjabrao Deshmukh Hostel Allowance

दुष्काळ आणि वाढत्या महागाईमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर आर्थिक अडचणी वाढत असल्यामुळे वार्षिक भत्ता ६० हजारांवरून ८० हजार रुपये करण्याची मागणी

marathinews24.com

पुणे – Dr. Panjabrao Deshmukh Hostel Allowance : सध्याच्या घडीला राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सध्या कमकुवत झाल्याने मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागविणे पालकांसाठी अवघड होत चालले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता (Dr Panjabrao Deshmukh Hostel Allowance) योजनेच्या अनुदानातही वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

कष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालकांची दिवाळी गोड! – सविस्तर बातमी 

राज्यामध्ये सध्या अनेक भागांत दुष्काळ असल्यामुळे शेतीमधून मिळणारे उत्पन्न खूप कमी असल्यामुळे या वर्षी शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित संपूर्ण कोलमडले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि पिंपरी-चिंचवड यांसारख्या शहरांमध्ये राहून उच्च शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या खूप अवघड होत आहे. शहरामध्ये राहण्याच्या खोलीचा खर्च, भोजन, प्रवास आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च सातत्याने वाढत असल्याने विद्यार्थ्यांवरील आर्थिक भारही वाढला आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत सध्या मिळणारा वसतिगृह निर्वाह भत्ता खूपच कमी असल्याने विध्यार्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. ग्रामीण आणि दुष्काळी भागातून उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वार्षिक ८० हजार रुपये देण्याची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वार्षिक ६० हजार रुपयांवरून ८० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता (Dr. Panjabrao Deshmukh Hostel Allowance) योजनेच्या लाभार्थ्यांनाही वाढीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सध्याचा वार्षिक निर्वाह भत्ता ६० हजार रुपयांवरून ८० हजार रुपये करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे तसेच महागाईमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शासनाने पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची रक्कम वाढवून इतर योजनांच्या धरतीवर 80 हजार करण्यात यावी. – अजय देशमुख (दुष्काळग्रस्त विद्यार्थी)

“शासनाने ‘स्वाधार’ योजनेच्या अनुदानात रु. ६०,००० वरून रु. ८०,००० पर्यंत वाढ करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र, महानगरांमधील वाढती महागाई आणि दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची बिकट आर्थिक स्थिती पाहता, ‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने’अंतर्गत मिळणारे सध्याचे अनुदान अत्यंत अपुरे पडत आहे. समान शैक्षणिक न्यायाच्या तत्त्वानुसार, शासनाने या योजनेच्या भत्त्यातही ‘स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर तात्काळ रु. ८०,००० पर्यंत वाढ करावी, अशी मागणी आम्ही मा. मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आर्थिक चणचणीमुळे ग्रामीण भागातील एकाही गुणवंत विद्यार्थ्याचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी शासन यावर लवकरात लवकर सकारात्मक शासन निर्णय (GR) निर्गमित करेल, अशी आम्हाला खात्री आहे. – सार्थक खैरे (दुष्काळग्रस्त विद्यार्थी)

सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा

स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचाही विचार होणे आवश्यक आहे. वाढती महागाई आणि ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा. आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी तातडीने अनुदानवाढ करावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×